बी ओरिजनल 

पूजा सामंत
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

सोनम कपूर हिचा उल्लेख नेहमीच ‘फॅशन दिवा ’ ‘फॅशनिस्ता ’  किंवा ‘फॅशन आयकॉन’ असा केला जातो. वडील अनिल कपूर अभिनेता आहेत, काका (बोनी कपूर ) निर्माता, धाकटे काका संजय कपूरदेखील अभिनेता, काकी -श्रीदेवी अभिनय निपुण. तात्पर्य काय तर सोनमकडे अभिनयाचे बाळकडू वारशाने येणे स्वाभाविक आहे; पण या अभिनेत्रींकडे जगभर नाव होईल इतका फॅशन सेन्स, फॅशनची जाणीव कुठून आली असावी, हा प्रश्न पडणे साहजिक असते! आयफा पुरस्कार संपत नाही, तोपर्यंत सोनम आणि तिची धाकटी (निर्माती) बहीण रिया कपूर यांनी आपला न्यूयॉर्क येथील मुक्काम वाढवला. कारण, त्या दोघी मिळून ’रेहसन’ हा स्वतःचा फॅशन ब्रॅंड न्यूयॉर्कहून लाँच करत आहेत.

सोनम कपूर हिचा उल्लेख नेहमीच ‘फॅशन दिवा ’ ‘फॅशनिस्ता ’  किंवा ‘फॅशन आयकॉन’ असा केला जातो. वडील अनिल कपूर अभिनेता आहेत, काका (बोनी कपूर ) निर्माता, धाकटे काका संजय कपूरदेखील अभिनेता, काकी -श्रीदेवी अभिनय निपुण. तात्पर्य काय तर सोनमकडे अभिनयाचे बाळकडू वारशाने येणे स्वाभाविक आहे; पण या अभिनेत्रींकडे जगभर नाव होईल इतका फॅशन सेन्स, फॅशनची जाणीव कुठून आली असावी, हा प्रश्न पडणे साहजिक असते! आयफा पुरस्कार संपत नाही, तोपर्यंत सोनम आणि तिची धाकटी (निर्माती) बहीण रिया कपूर यांनी आपला न्यूयॉर्क येथील मुक्काम वाढवला. कारण, त्या दोघी मिळून ’रेहसन’ हा स्वतःचा फॅशन ब्रॅंड न्यूयॉर्कहून लाँच करत आहेत. या लेबलसाठी अधिक डिटेलिंग करण्यासाठी सोनमने तिचा अमेरिकेतील आपला मुक्काम वाढवला! 
असो , ’फॅशन दिवा’ ठरलेल्या सोनमने फक्त फॅशन या विषयावर गप्पा केल्या...

’सोनम, फॅशन म्हणजे काय? तुझी व्याख्या कोणती? 
सोनम - माझ्या दृष्टिकोनातून फॅशन म्हणजे स्वतःला कम्फर्टेबल वाटेल, आवडेल असे राहणे, तसे ड्रेस वापरणे. जी फॅशन ट्रेंडमध्ये आहे तीच करणे किंवा सगळयांनी केलेली फॅशन सगळे करतात, म्हणून स्वतः करणे सर्वस्वी चुकीचे आहे. 

माझ्या कुटुंबात मी मोठी असल्याने लहानपणी मी वापरलेले ड्रेस रियाने खूपदा आवडीने वापरले आहेत. मला नेहमीच असं वाटत आलंय, माझ्यापेक्षा रियाचा फॅशन सेन्स उत्तम आहे.  विषयांतर होतंय माझ्याकडून; पण माझा फॅशन सेन्स किंवा फॅशन प्रवास कसा, कधी सुरू झाला हे मलाही कळलं नाही! मी फॅशनवर काही डिप्लोमा, डिग्री घेतली नाहीये, हळूहळू मी फॅशनबद्दल सजग होत गेले आणि फॅशन सेन्स डेव्हलप होत गेला असावा. त्यामुळे फॅशनची व्याख्या मी करणे योग्य नाही. 

कॅन यू बिलिव्ह मी? मी फिल्म्समध्ये येण्यापूर्वी वजनदार होते. बॉलिवूड गाठलं आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवत आणला. माझी आई सुनीता कपूर ही आहारतज्ज्ञ असल्यानं माझं काम सहज शक्‍य झालं. तिने माझा मला अचूक डाएट प्लॅन बनवून दिला. हे सांगण्याचे कारण असे, की मी जोपर्यंत सिंगापूरला शिक्षणासाठी होते, तेव्हा लठ्ठ होते. मुंबईत यावं आणि काही तरी क्रिएटिव्ह करावं या विचाराने मी पपांना दररोज भंडावून सोडलं ! त्यांनी संजय लीला भन्साली यांना फोन केला आणि चौथी सहायक दिग्दर्शक म्हणून माझी नेमणूक केली. या कालावधीत मी सेटवर माधुरी, ऐश्वर्या यांना पाहिलं. त्या स्वतःला कसं कॅरी करतात हे लक्षात येत गेलं आणि या दरम्यान मी सडपातळ व्हावं, प्रेझेंटेबल दिसावं या विचारांनी माझ्यावर गारूड केलं. स्वतःबद्दची सजगता माझ्यात निर्माण झाली. कदाचित फॅशन म्हणजे कशी असावी आणि कशी नसावी याचं ज्ञान मला येण्याचा तो काळ होता. 

माझं बालपण प्रोटेक्‍टेड, अगदी चार भिंतींच्या आत गेलं. शाळेतून घरी आल्यावर बहुधा घरीच खेळणं व्हायचं. कुठली फॅशन आणि कुठला फॅशन सेन्स! आणि शिवाय माझं बालपण जॉइंट फॅमिलीत गेलं. आम्ही सगळे तेंव्हा चेंबूरला मध्यमवर्ग असलेल्या विभागात राहत होतो. ’सावरिया’साठी संजय लीला भन्साली यांनी मला नायिका म्हणून घेण्याचा विचार डॅडकडे व्यक्त केला आणि मी मोहरून गेले! भन्साली त्यांचे सिनेमा, नायक-नायिका यांचा अगदी बारकाईने विचार करतात. ‘सावरिया’साठी माझा लूक कसा असावा. मला कुठले कलर्स स्क्रीनवर शोभून दिसतील यासाठी मी श्री आंटी (श्रीदेवी) ला भेटले. तिने मला बरंच गाइड केलं. श्री आंटीची अतिशय उच्च अभिरुची आहे. सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी कसा पेहेराव असावा हे अनुभवाने ती खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. श्री (देवी) काकीने मला ही जाणीव करून दिली, पडद्यावरची फॅशन आणि प्रत्यक्षातील फॅशन यात गल्लत होता कामा नये! 

ती उदाहरण देताना सांगायची, ‘ऑन स्क्रीन मी आम्रपाली ड्रेस घालून डान्स केला, (हिम्मतवाला) पण रियल लाइफमध्ये कुठलेही ‘रिव्हिलिंग’ परिधान करणं मला पसंत नाही!’ फॅशन वुईथ डिग्निटी असावी, हे मी श्री आंटीकडून शिकले. 

तुझा स्वतःचा फॅशन सेन्स पुढे कसा डेव्हलप झाला?’
सोनम - ‘सुदैवाने मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या. ‘सावरिया’नंतर ‘रांझणा’ ‘प्रेम रतन धन पायो’ ‘डॉली की डोली’ दोन वर्षांपूर्वी ‘नीरजा’ ‘आयशा’  ‘खूबसूरत’ अशा सगळ्याच भूमिका खूप वेगळ्या होत्या! या भूमिकांनी व्यावसायिकदृष्ट्या मला खूप नाव दिलं नसलं, तरी माझा लूक, कॉस्च्युम्स आणि माझा स्क्रीन प्रेझेन्स यावर माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली. प्रत्येक व्यक्तिरेखा यात कमालीचा वेगळेपण होता आणि त्यामुळे माझी विविध रूपांमधली व्यक्तिरेखा सामोरी आल्याने मी कुठल्याही भारतीय किंवा वेस्टर्न अवतारात शोभू शकते हे मला जाणवले. आपल्याकडे आवश्‍यक तितके लक्ष लूक, स्क्रीन प्रेझेन्सकडे दिलं जात नाही, हे लक्षात आल्यावर मी जाणीवपूर्वक फॅशन मॅगझिन्स, हॉलिवूड फिल्म्स, फॅशन वीक्‍सकडे आर्वजून लक्ष देत गेले. ‘लॉरियल’ या ब्रॅंडसाठी माझी निवड होणे आणि त्या कान्स फिल्म्स फेस्टिव्हल्ससाठी रेड कारपेटवर वॉक या व्यावसायिक सुवर्ण संधीने माझे फॅशन नॉलेज खरंच वाढले.’ 

‘सोनम आणि फॅशन हे समीकरण जुळलं; पण आणखी बॉलिवूडमधल्या कुठल्या अभिनेत्री फॅशन आयकॉन आहेत?’
सोनम - नव्वदच्या दशकात माझी काकी श्रीदेवी आणि त्यापूर्वी हेमा मालिनी या अभिनेत्रीने स्वतःला खूप आकर्षकरीत्या आणि ग्रेसफुली कॅरी केलं. 
सध्याच्या काळात मला बेस्ट करीना कपूर वाटते. तिची फॅशन अंडर स्टेटेड असते, त्यामुळे तिच्या फॅशन स्टेटमेंटचा गवगवा होत नाही. 
मी नाव न घेता असं म्हणेन - काही बॉलिवूडच्या नायिकांची फॅशन खूप लाउड असते .. ’

सोनम, स्वतःला फॅशन आयकॉन म्हणवतेस, तुझं फॅशन स्टेटमेंट काय?’
सोनम - मला ‘व्हिंटेज कपडे -लूक’ खूप आवडतो. दर १०-१५ वर्षांनी अस्तंगत झालेल्या फॅशन पुन्हा येतात; पण सिनेमात मात्र माझी जशी व्यक्तिरेखा असेल तसे मेकअप लूक आणि काॅस्च्युम वापरणे नक्कीच आवडते. मी जगात बहुतेक देशांमध्ये फिरलेय. जिथे जाते, तिथे मी ॲक्‍सेसरिज आणि व्हिंटेज लूक असलेले ड्रेस विकत घेते. लूकला साजेशी बॅगदेखील माझ्याकडे असते. लेबल किंवा डिझायनरचे कपडे, बॅग्जस महाग असतात, बॅग्जससाठी माझा फेव्हरेट ब्रॅंड ‘प्रादा’ आहे; पण नेहमीच मी लेबल असलेले कपडे वापरत नाही. स्ट्रीट फॅशनदेखील मला भावते. सध्या मी लेयर्ड स्कर्ट्‌सच्या प्रेमात आहे. सध्या स्कर्ट्‌सची फॅशन इन आहे. माझा फॅशन मंत्र आहे, जे ड्रेस-कपडे -लूक वापराल, ते आत्मविश्वासाने वापरा. जी फॅशन करायची ती आत्मविश्‍वासाने करा. फॅशनमध्ये दुसऱ्यांची नक्कल केली तर तुमचा ठसा उमटत नाही ! 
सो बी ओरिजिनल !
(मुलाखत- पूजा सामंत)

संबंधित बातम्या