फॅशन अॅक्‍सेसरिज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

फॅशन इंडस्ट्रीमध्ये कपडे जेवढे महत्त्वाचे तेवढ्याच अॅक्‍सेसरिजही. अॅक्‍सेसरिज कपड्यांची शोभा वाढवतात. अॅक्‍सेसरिजमध्ये व्हरायटी खूप असते. त्याची निवड योग्य व्हायला हवी.. 

रिंग्ज
कार्यक्रमासाठी गोल्ड किंवा सिल्व्हर आणि इतर वेळी ऑक्‍सिडाइझ रिंग्जला पसंती देऊ शकता. इंडियन कुर्ता, अनारकलीसोबतच वेस्टर्न, टॉप, वनपीस अशा ड्रेसवर ऑक्‍सिडाइज रिंग्ज शोभून दिसतात. याच्या विविध व्हरायटी उपलब्ध आहेत, जसं ह्यूज साइझ रिंग, डबल फिंगर रिंग, नेल आर्ट रिंग, फूल फिंगर रिंग, फोर फिंगर रिंग, मिड फिंगर रिंग इत्यादी.

अँकलेट्‌स
पायल, पैंजण यांचे नवीन रूप म्हणजे अँकलेट्‌स. अँकलेट्‌सला घुंगरू असतातच असं नाही. त्यात मुलींना सतत वाजणारे घुंगरू अनेकदा आवडतही नाहीत. अँकलेट्‌स घालताना शक्‍यतो ड्रेसची लांबी कमी असावी, जेणेकरून अँकलेट्स फोकसमध्ये येतील. गुडघ्यापर्यंतच्या उंचीच्या वनपीस ड्रेससोबत अँकलेट्‌स छान दिसतात. यामुळे ड्रेसमध्ये अँकलेट अडकण्याची भीतीही राहत नाही. वेगळी फॅशन म्हणून पायात एकच अँकलेट घालण्याऐवजी एकाच पायात दोन किंवा तीन अँकलेट्‌सही घातले जातात. अर्थात अशावेळी त्याचा आकार आणि साइजचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मोठा अँकलेट आणि दोन छोटी अँकलेट्‌सही छान दिसतात किंवा एकाच आकाराची वेगवेगळी अँकलेट्‌सही घालता येतील. 

बॅग्ज
वेगवेगळ्या बॅग्ज वापरणं अनेकांना आवडतं. पावसाळ्यात बॅग्जमध्ये पाणी जाऊन सगळं सामान खराब होणं ही एक समस्या आहे. यामुळे अनेकदा या काळात सामान प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून न्यावं लागतं. या पिशव्या उघडतानासुद्धा पाणी सामानात जातंच. लेदर, रेक्‍झिनच्या बॅग्ज पावसाळ्यात वापरण्यास अयोग्य ठरतात. या बॅग्जना बुरशी येते किंवा पावसात भिजल्यावर त्याला एका प्रकारची दुर्गंधी येते. पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या बॅग्जचा पर्याय अधिक चांगला आहे. या पारदर्शी आणि फ्लोरोसंट रंगाच्या असतात. त्यामुळे स्टाइलमध्ये भरच पडते. याशिवाय ग्लॉसी रेक्‍झिनच्या बॅग्जही वापरता येतील. 

हेड चेन
लग्नासारख्या खासप्रसंगी इंडियन वेअर जसं साडी, साडी लहेंगा, लहेंगा चोली, अनारकलीसोबत टिपिकल मांगटीका घालण्याऐवजी हेड चेन ट्राय करू शकता. सिंपल असूनदेखील हा खूपच स्टाइलिश लूक देतो. लाइट वेट असल्यामुळे त्रासदायकही वाटत नाही.

संबंधित बातम्या