कूल अॅक्‍सेसरिज

समृद्धी धायगुडे
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

फॅशन इंडस्ट्रीत पेहरावाबरोबरच अॅक्‍सेसरिजनादेखील तितकेच महत्त्व असते. तुमच्या लाइफ स्टाइलच्या अविभाज्य घटक असलेल्या या ॲक्‍सेसरिजमधून आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा निवडाव्यात. या ॲक्‍सेसरिज तुमच्या प्रत्येक पेहरावावर शोभतील अशा, फंकी स्टाइल, ट्रॅडिशन वेअर्सवर शोभतील अशा उपलब्ध असतात. अशाच काही हटके अॅक्‍सेसरिजची फॅशन.... 

फॅशन इंडस्ट्रीत पेहरावाबरोबरच अॅक्‍सेसरिजनादेखील तितकेच महत्त्व असते. तुमच्या लाइफ स्टाइलच्या अविभाज्य घटक असलेल्या या ॲक्‍सेसरिजमधून आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा निवडाव्यात. या ॲक्‍सेसरिज तुमच्या प्रत्येक पेहरावावर शोभतील अशा, फंकी स्टाइल, ट्रॅडिशन वेअर्सवर शोभतील अशा उपलब्ध असतात. अशाच काही हटके अॅक्‍सेसरिजची फॅशन.... 

पादत्राणे - काही काळापूर्वी चप्पल, शूज या तशा गरजेच्या वस्तू या प्रकारात मोडत होत्या. काळ्या किंवा चॉकलेटी रंगाचा एकच जोड झिजेपर्यंत वापरला जायचा; पण आता मात्र हे चित्र बदलले आहे. घरातल्या प्रत्येकाचे जीम, खेळायचे, सकाळी फिरायचे, नेहमीचे आणि ठेवणीतले अशा अनेक चपला-बुटांचे जोड शू रँकमध्ये गर्दी करतात. चप्पल, बुटांच्या रंगांतही विविधता आली आहे. काळा, पांढरा, लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी असे कपड्यांमध्ये दिसणारे रंग आता चप्पल, बुटांमध्ये दिसू लागले आहेत. एवढेच नव्हे तर वेल्वेट, पोल्का डॉट, कुंदन वर्क या कपड्यांवरच्या डिझाइन्स बुटांमध्येही पाहायला मिळतात. सध्या बाजारात लोफर, मोजडी, वेजेस, डेनिम शूज, बेली, बॅलेरिनाज असे विविध प्रकार आले आहेत. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्‌सवर कस्टमाइज्ड करून देणारे डिझायनर्सची संख्याही वाढत आहे. 

स्टायलिश ‘मिडी रिंग’ - एका बोटात दोन किंवा अधिक अंगठ्या घालण्याची ही फॅशन हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत लोकप्रिय आहे. अमेरिकेची अभिनेत्री, लेखिका लिसा वॅलेरी कुड्रॉने व त्यानंतर सेलिब्रिटी बियॉन्स नाऊल्स, अँजेलिना जोली, रिहाना यांनीही मिडी रिंगला पसंती दिली. 

एक, दोन किंवा सगळ्या बोटांत अशा रिंग्ज घालण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये नॉट, स्नेक, डबल बार, मून, स्टार, हार्ट, क्राउन, पिरॅमिड, डबल मिडी बॅंड, क्‍लासिक मिडी बॅंड असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. बोटाच्या पुढच्या आणि मागच्या भागात अंगठी आणि त्याला जोडणारी चेन असे प्रकारही यात आहेत. यामध्ये बाँडेज चेन रिंग, क्रिस्टल केज रिंग हे प्रकार उपलब्ध आहेत. या रिंग्ज एथेनिक आणि वेस्टर्न कपड्यांसोबत वापरता येतील. 

कूल अॅक्‍सेसरिज - सध्या नुसते स्मार्टफोन वापरून कोणी स्मार्ट होत नाही, तर तुमच्या सर्व गॅजेट्‌सच्या ॲक्‍सेसरिजदेखील कूल असायला हव्यात. शॉपिंग करताना बहुतेक तरुणांचा खर्च या ॲक्‍सेसरिजवरच अधिक होतो. स्मार्टफोनची फ्लॅप असलेली, स्टॅंड असलेली, बेल्टमध्ये लावता येण्यासारखी कव्हर्स, मुलींसाठी बार्बी, पिंक कलरच्या स्टिकर्स, काही अॅटिट्यूड दाखवणाऱ्या कोट्‌सची पोस्टर, स्टीकर्स लॅपटॉप, फॅब्लेट, स्मार्टफोनला लावण्याची क्रेझ आहे.

फंकी क्‍लचेस - वेस्टर्न आउटफिट्‌स किंवा कॅज्युअल लूकमध्ये थोडा ट्‌विस्ट आणायचा असल्यास बाजारात आलेल्या फंकी क्‍लच पर्स नक्की वापरून बघा. तरुणींमध्ये नेहमीच अशा फंकी डिझाइन्सच्या आणि स्लोगन असलेल्या क्‍लचेसची खूप क्रेझ असते. या बॅग्जमध्ये रेडिओ, वेगवेगळे हावभाव असलेले ह्युमन फेसेस यांची प्रचंड क्रेझ आहे. 

फूडी अॅक्‍सेसरिज - खवय्यांसाठी या ॲक्‍सेसरिज जर बाजारपेठेत दिसल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको. नेदरलँडमधील रोमी डेबोमी नावाच्या एका आर्टिस्टने कुकीजचे नेकलेस नेक टाय, पर्स डिझाइन केल्या आहेत. तुम्हाला पण अशा यम्मी ॲक्‍सेसरिज नक्की वापरायला आवडतील. 

गोड्यांच्या ‘गोंडस’ अॅक्‍सेसरिज - फॅशन म्हणून प्रत्येक अॅक्‍सेसरिजमध्ये वैविध्य पाहायला मिळते. कापडी, लोकरीचे गोंडे हे पूर्वी राजस्थानमधील जीवनशैलीत पाहायला मिळायचे. आता हे गोंडे केवळ त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून मुलींच्या बॅग्ज, पर्स, पादत्राणे अशा विविध ॲक्‍सेसरिज दिसत आहेत. ड्रेसनाही असे गोंडे लावण्याची फॅशन इन आहे.

कानातले, नेकपीस, ब्रेसलेट, पर्स क्‍लचेस, पादत्राणे, हेअर अॅक्‍सेसरिज यामध्ये उपलब्ध आहेत. गडद रंगांचे गोंडे कोल्हापुरी चप्पल किंवा फ्लॅट हिल्सवर नाजूक घुंगरांच्या साह्याने लावले की हटके फॅशन वाटते. 

मेटॅलिक अॅक्‍सेसरिज 
हेअर अॅक्‍सेसरिज - कपड्यांच्या फॅशनबरोबर मुलींच्या केशरचनेमध्येही बदल केले जातात. यासाठी चांगल्या हेअर ॲक्‍सेसरिजचा वापर केला जातो. यामध्ये मेस्सी बन उठून दिसण्यासाठी पानांच्या आकाराच्या हेअर कफला मुली प्राधान्य देतात. दुसरा प्रकार पोनिटेल, याचा उपयोग ‘हाय पोनी’ बांधण्यासाठी होतो. वेणी घातल्यानंतरही ‘मेटॅलिक बो’ बांधल्यास प्रिटी लूक येतो. या हेअर कफना सध्या प्रचंड मागणी आहे. 

हल्ली फॅशन म्हणून मोबाईल कव्हर्स, नेलपेंट, बेल्ट अशा सर्व ॲक्‍सेसरिजना मेटॅलिक टच आलेला दिसतो. मेटॅलिक लिपस्टिक, आयशॅडोज, शूज, बेल्ट आणि हेअर कफ, पोनिटेल रिंग्ज यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. या ॲक्‍सेसरिज नाइट पार्टीज, रिसेप्शन, डेटवर जाताना नक्की ट्राय करा. 

प्रिन्सेस आय - हॅरी पॉटर फेम एमा वॉट्सनच्या ‘ब्युटी अँड बेस्ट’ चित्रपटामुळे फॅशन आणि मेकअपमध्ये बरेच नवनवे ट्रेंड आले आहेत. मेकअपच्या क्षेत्रात क्राउन आयशेडोजचा लूक सध्या विशेष लोकप्रिय होत आहे. जर्मन मेकअप आर्टिस्ट स्वेटलाना पेटूहोवा आणि अमेरिकेतील मेकअप आर्टिस्ट मेरिस्सा मेल्होर्न यांनी हा ट्रेंड आणला. प्रत्येक मुलगी ही आपल्या आई-वडिलांसाठी प्रिन्सेसच असते, त्यामुळे तिने हा क्राउन नक्‍कीच घालायला हवा; पण डोक्‍यावर नाही तर आत डोळ्यांवर. क्राउन मेकअप हा रेग्युलरसाठीचा प्रकार नसून, लेट नाइट पार्टीज, हॅलोविन डेज, व्हॅलेंटाइन्स डे पार्टी, फॅन्सी कॉन्स्प्टस पार्टीजला, जाताना उठून दिसतो. या आय मेकअपसाठी पापण्या, हात अत्यंत स्थिर ठेवावा लागतो. तसेच हा मेकअप शक्‍य तो जाणकारांकडून करून घ्यावा. या मेकअपसाठी तुम्ही ग्लिटर, क्रिस्टल, ग्लॅमपचा वापर करू शकता. या क्राउन आय शॅडोमध्ये पिंक, मोरपंखी, ब्ल्यू, गोल्डन असे रंग वापरू शकता. 

चीझी नेल्स 
मेनीक्‍युअरमध्येही एक नवा ट्रेंड येत आहे तो म्हणजे फुडी लोकांसाठी चिझी नेल्सचा. जपानमधील एका नेल आर्टिस्टने चीज लव्हर, फुडी लोकांसाठी स्विस चीज मेनीक्‍युअर आर्ट केले आहे. मेनीक्‍युअरमध्येही फुडी आर्ट करण्याचा ट्रेंड रुळत आहे. यामध्ये पिझ्झा, डोनट, स्विस, चिझी नेल्स, कॅंडीजसारखे कलरफुल नेल आर्ट केल्यास कोणत्याही कॅज्युअलवर सूट होते 
-------------------

संबंधित बातम्या