फॅशन प्रत्येकीसाठी 

चैत्राली डोंगरे
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

एका वर्षात आपल्याला बारा महिने पाहायला मिळतात, तसेच अनेक वेगवेगळे ऋतूसुद्धा आपण अनुभवतो. या जगात माणसे ही पूर्णपणे जगण्यासाठी ‘चुझी’ झाली आहेत किंवा काही वेळेस आजूबाजूचा परिसरच त्यांना बदलायला कारणीभूत ठरतो. महिलांच्या अंगावर पावसाळ्यात रेनकोट, जर्किन, तर हिवाळ्यात स्वेटर आणि उन्हाळ्यात टोपी, स्कार्फ, सनकोट दिसून येतो. आता या झाल्या ऋतुबदलाप्रमाणे असणाऱ्या गरजा; पण याचबरोबर सध्याच्या जीवनात फॅशन ही पण एक गरज निर्माण झाली आहे आणि ही फॅशन प्रत्येक मुलामुलीमध्ये, स्त्री-पुरुषांत दिसून येते; पण सगळ्यात जास्त दिसून येते ती महिलांमध्ये.

एका वर्षात आपल्याला बारा महिने पाहायला मिळतात, तसेच अनेक वेगवेगळे ऋतूसुद्धा आपण अनुभवतो. या जगात माणसे ही पूर्णपणे जगण्यासाठी ‘चुझी’ झाली आहेत किंवा काही वेळेस आजूबाजूचा परिसरच त्यांना बदलायला कारणीभूत ठरतो. महिलांच्या अंगावर पावसाळ्यात रेनकोट, जर्किन, तर हिवाळ्यात स्वेटर आणि उन्हाळ्यात टोपी, स्कार्फ, सनकोट दिसून येतो. आता या झाल्या ऋतुबदलाप्रमाणे असणाऱ्या गरजा; पण याचबरोबर सध्याच्या जीवनात फॅशन ही पण एक गरज निर्माण झाली आहे आणि ही फॅशन प्रत्येक मुलामुलीमध्ये, स्त्री-पुरुषांत दिसून येते; पण सगळ्यात जास्त दिसून येते ती महिलांमध्ये.

स्त्रियांच्या शारीरिक ठेवणीप्रमाणे कुणाला कुठली फॅशन चांगली दिसते, याविषयी आपण बोलू. उंच, बारीक, जाड आणि बुटक्‍या अशा शरीरयष्टीच्या महिला असतात. फॅशन करण्यामागे अनेक हेतू असतात. काहींना ती फॅशन आवडली म्हणून करतात, तर काही जणी ती केल्यावर चांगल्या दिसतात म्हणून करतात. कधीकधी जाडी अधिक असण्याचा किंवा उंची कमी असण्याचा कपडे वापरताना कॉम्प्लेक्‍स येतो. कधी उंची कमी असेल तर विशिष्ट प्रकारचे कपडे घातले की उंच दिसेल किंवा विशिष्ट डिझाइनच्या कपड्याने जाडी कमी दिसेल, असे सल्ले मिळतात. प्रत्येक स्त्री शारीरिकदृष्ट्या वेगळी असते. त्याअनुषंगाने कुणाला कोणती फॅशन छान दिसू शकते, याचा विचार करावाच लागेल.   

उंच स्त्रिया - यांच्या उंचीमध्येच एक वेगळेपणा दिसून येतो. या राहायला जेवढ्या साध्या, तेवढ्यात त्या दिसायला सुंदर असतात. 

उंच महिलांनी टाइट फिटिंग जिन्स, थ्री-फोर्थ केप्री, हॉट पॅंट, टी-बॅग, गंजीस, शॉर्ट स्कर्ट घालावेत. त्यांची बॉडी प्रपोर्शनेट असल्यामुळे त्या यात आणखी सुंदर दिसू शकतात. 

बऱ्याच वेळेला काही जणींना उंची आवडत नाही. त्या वेळेस गडद रंगाचे आणि मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या डिझाइनचे टॉप घालावेत.

वनपीस, हॉट पॅंट आणि स्कर्टवर बेल्ट वापरा. शर्ट, टॉप टक इन करा. गुडघ्यापर्यंत बूट घाला. आडव्या लायनिंगच्या लाँग मॅक्‍सीपण छान दिसतात.

उंची हाच एक प्रकारचा दागिना असल्यामुळे जेवढ्या उंच मुली साध्या राहतील, तेवढ्या त्या सुंदर दिसतील. केस मोकळे सोडा. कमीत कमी दागिन्यांचा वापर करा. 

जर कपड्यावर भरगच्च एम्ब्रॉयडरी असेल तर दागिने घालणे टाळा. 
बोट नेक, ब्रॅकलेस, स्लिव्हलेस, हाल्टर नेकच्या पॅटर्नचे कपडे घाला. लेगिन्स, जेगिन्सवर लाँग शर्ट्‌स घालावेत. मोठ्या आकाराच्या हॅंडबॅग, पर्स कॅरी कराव्यात.
 
बारीक स्त्रिया : काही जणी नॉर्मल बारीक नसून एकदमच बारीक असतात. अशांना आपण थोडे जाड असायला हवे होते, असे वाटते. म्हणून त्या अनेक प्रयोग करताना दिसतात. अशा वेळेस कपड्यांवर प्रयोग केल्यास त्या छान दिसू शकतात. वेगवेगळ्या टेक्‍स्चरची कापडे (फॅब्रिक) असतात. जाड कपड्याचे ड्रेस घातल्यावर अशांचे शरीर भरलेले दिसते. 

मोठ्या गोळ्यांचे डिझाइनचे किंवा मोठ्या फुलांच्या डिझाइनचे कपडे घातल्यावर आपोआप शरीर नॉर्मल दिसते. 

ए-लाइनचे शॉर्ट स्कर्ट्‌स, वनपीस, स्लिव्हलेस ब्लाउज-टॉप-कुर्ता, ट्यूब टॉप, डिपनेकचे टी-शर्ट बारीक मुली किंवा स्त्रियांना छान दिसतात. 

मान बारीक असेल तर ती झाकायला वेगवेगळ्या स्टाइलने गळ्यामध्ये स्कार्फ आणि स्टोल्सचा उपयोग करता येतो. प्लेन काळ्या रंगाचे कपडे घालायचे टाळा. कारण, आपण यात अजून बारीक दिसू शकता. स्टार्च केलेली कॉटन साडी घातल्यास शरीराला छान गेटप येतो. 

जिन्स आणि शॉर्ट टॉपही छान दिसतात. लोंबते कानातले किंवा मोठे कानातले छान दिसतात. 

शरीरयष्टी बारीक असल्यामुळे मोठ्या पेण्डण्टचे नेकलेस, मोठे ब्रेसलेट, मोठा कडा, खूप बांगड्याही छान दिसतात.

वनपीस घालायची इच्छा असल्यास त्यावर मोठा बेल्ट घातला, तर आपोआप कमरेचा आकार भरीव दिसतो. स्किन फिटिंग जिन्स टाळाव्यात. बूट कटच्या जिन्स घालाव्यात. पॅडेड इनर्सचा वापर केल्यास शरीराचा आकार चांगला दिसायला मदत होते. 

जिन्स स्कर्ट, जिन्स शर्ट आणि जिन्सचे जॅकेट, लेदरचे जर्किन घातले, तर बारीकपणा झाकला जातो.

पलाझो घातली तर बारीक पाय झाकले जातात. केस मोकळे सोडले, तर ते शरीराला बॅलन्स व्हायला मदत करतात. मान आणि खांदा बारीक असल्यास तो झाकला जातो.

लेगिन्स आणि लूझ स्लिव्हजचे कुर्ते घालावेत. ओढणी वन साइडेड घ्यावी. शक्‍यतो डिझाइनची ओढणी घ्यावी. बॉक्‍स हिलचे फूटवेअर वापरा.
 
लठ्ठ स्त्रिया : मनात आणले तर लठ्ठ महिलासुद्धा खूप सुंदर दिसू शकतात. डार्क रंगाचे आणि छोट्या डिझाइनचे कपडे घाला. 

स्लिव्हलेस टाळा. कारण, दंड जाड असल्यामुळे यात ते चांगले दिसत नाहीत. पूर्ण बाह्यांचे किंवा थ्री-फोर्थ बाह्यांचे कपडे घालावेत. मागील बाजूचा गळा डिप नसावा. 

कुर्ता घालत असाल, तर कुर्त्याचे साइड कट खूप मोठे नसावेत किंवा मी असे म्हणेन, की ए-लाइनचे साइड कट नसलेले कुर्ते घालावेत. ज्यात मांड्यांकडे लक्ष जाणार नाही. त्यामुळे बारीक दिसायला मदत होईल. 

कॉटनच्या ओढण्या घ्याव्यात? त्याही दोन्ही बाजूने. त्यामुळे छाती झाकायला मदत होईल. लठ्ठ महिलांनी लेगिन्स आणि चुडीदार घालणे टाळावे. सलवार घालावी, ज्यात जाडी लपली जाते.

गुडघ्यापर्यंत लांब कुर्ता घातल्यास मांडी झाकली जाते, त्यामुळे जाडी कमी दिसते. जिन्स घालायची असेल तर ती स्ट्रेट डार्क रंगाची घालावी आणि त्यावर लाइट कलरचे लांब शर्ट्‌स किंवा टॉप्स घालावेत. जे लूझ असतील. लाँग स्कर्ट आणि लाँग फॉक घाला, तेही ए-लाइनचे.

एखाद्या पार्टीला जाताना बारीक दिसावे, असे वाटत असेल तर कोर्सेटचा वापर करावा. हा कुठल्याही लेडीज गारमेंटच्या दुकानात मिळतो. कोर्सेट वनपीस, ड्रेस, फॉक, शर्टच्या आतून घालता येते. ज्यामुळे पोट आणि जाडी कमी दिसायला मदत होते. 

साडी नेसायची असेल, तर त्यावर ब्लाउज क्‍लोज नेकचे किंवा स्टँड कॉलरचे घालावेत, ज्यात मान आणि खांदा झाकला जाईल. 

उभ्या डिझाइनचे कपडे घातले, तर आपोआपच आपण बारीक दिसतो. लांब बाह्यांचे आणि लांब जॅकेटचा वापर करावा.

मोठ्या फ्रेमचे गॉगल घालणे टाळा. तसेच मोठे किंवा लोंबते कानातले घातले, तर ते आकाराचे घाला. 

टाइट पट्ट्याचे घड्याळ घालू नका. लूज पट्ट्याचे घाला. 

जास्त बटबटीत, चमकणारे किंवा जरी बॉर्डर, जरीचे लेस असलेले कपडे घालू नका आणि मेकअप पण खूप गॉडी करू नका. 
 
कमी उंचीच्या स्त्रिया : कमी उंचीच्या स्त्रियांनी रेडिमेड कपडे विकत न घेता टेलरकडून कपडे शिवून घेतले, तर फारच छान. कारण, रेडिमेड कपडे उंची आणि फिटिंगला व्यवस्थित बसत नाहीत. 

छान लाइट पेस्टल कलरच्या बेसवर बारीक फ्लोरल किंवा मोकळ्या डिझाइनचे कपडे घालावेत. 

गळा मोठा नसावा किंवा गळ्याभोवतीचे डिझाइन बारीक आणि छोटे असावे. 

उंच वाटण्यासाठी स्टँड कॉलरचे स्लिव्हलेस आणि मेगा स्लिव्हचे कपडे घालावेत. 

कमी उंची असणाऱ्यांची पायाची उंची कमी असते. त्यामुळे वनपीस किंवा शॉर्ट ड्रेसेस घालू नयेत. 

चुडीदार किंवा लेगिन्स न घालता सलवार घालावी. कारण, यात पायाचा आकार दिसत नाही. कमीज किंवा कुर्ता गुडघ्याच्या उंचीपर्यंत घालावा. - एकाच रंगाचे कमीज आणि सलवार घातल्यास उंची ब्रेक होत नाही. एक सलगतेमुळे समोरून बघणाऱ्याला उंची कमी आहे, हे पटकन लक्षात येत नाही.

पातळ, मऊ कपडे घाला आणि शक्‍यतो अस्तर लावलेले कपडे टाळा. कारण, यात शरीर बोजड दिसते. स्लिव्हलेस घातल्यावर हात मोठे दिसतात.

ट्युनिक टॉप घालू नका. जिन्स घालायची असेल, तर ती हाय वेस्टची घाला आणि त्यावर शर्ट किंवा टी-शर्ट न घालता कुर्ता घाला.

शक्‍यतो वेगवेगळ्या हेअर स्टाइल न करता बॉयकट ठेवला, तर कमी उंची असली तरी स्मार्टनेस वाढतो. त्यामुळे चेहरा व उंची समतोल दिसण्यास मदत होते.

छोटी पर्स वापरा. पर्सचा बेल्ट जास्त मोठा करू नका. 

चप्पल किंवा सॅंडल बारीक डिझाइनचे आणि पट्ट्याचे घाला. तसेच क्रिम किंवा बेच कलरचे फूटवेअर घाला. ज्याने उंची अधिक दिसण्यास मदत होईल. कारण, समोर असलेल्यांचे पादत्राणाकडे आधी लक्ष जाते.

नेलपॉलिश लाइट कलरचे लावा. छोटे कानातले घाला. घड्याळही नाजूक घाला. ज्याचे डायल लहान असेल. गळ्यात बोजड वाटेल असे मोठ्या मोत्यांचे दागिने न घालता एक लहान साखळी आणि त्यात छोटे पेण्डण्ट घाला.

ऋतूंनुसार बदलणारी फॅशन
आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या महिलांना काय शोभून दिसू शकते, हे पाहिले; पण ऋतूंप्रमाणेसुद्धा आपल्या फॅशन बदलत जातात किंवा ऋतू आपल्याला ती फॅशन करायला लावतो. 

पावसाळा
जसे पावसाळ्यात टेरिकोटचे कपडे घालावेत, जेणेकरून पावसात भिजलो तरी ते पटकन वाळतात. शक्‍यतो जिन्स न घालता लेगिन्स, चिनोझचा वापर करावा, तेही थ्री-फोर्थ! म्हणेज रस्त्यावरून पाण्यातून चालताना कपडे भिजणार नाहीत. तसेच कपड्याचे मटेरिअल हलके असावे. कारण, पावसात भिजल्यानंतर कापड ओले होऊन जड होते. त्यामुळे वावरायला त्रास होतो. 

आपण पावसापासून संरक्षण म्हणून रेनकोट किंवा जर्किन घालतो. अशा वेळेस जाड कपड्यावर हे घातले तर आपण अधिक जाड दिसू शकतो. -कपडे पातळ असले तरी ते ट्रान्सफरन्ट नाही ना, याची काळजी घ्या. कारण, पाण्यात भिजल्यावर ते वाईट दिसू शके. पांढऱ्या आणि फिकट रंगाचे कपडे टाळा. कारण, यावर चिखल उडाला तर तो पटकन दिसून येतो. तसेच ज्या कपड्यांचे रंग जातात असे कपडे पावसाळ्यात घालणे टाळा. 

आजकाल रबराचे किंवा १२ महिने वापरता येतील असे फूटवेअर बाजारात दिसतात. तेही वेगवेगळ्या ड्रेसवर घालून फॅशन करता येते; पण कुठलेही फूटवेअर घेताना ते घालून चालताना पाय घसरणार नाहीत, चिखल उडणार नाही किंवा घट्ट पट्टे असतील, तर पाय दुखणार नाहीत ना, याची काळजी घ्या. 

शक्‍यतो स्लिपर किंवा त्यासारख्या चपला टाळा. कारण, चालताना चिखल उडू शकतो. लेसच्या बुटांचा वापर करत असाल तर जास्त वेळ पाय ओले राहणार नाहीत ना, याची काळजी घ्या. कारण, पायांना घाण वास येऊ शकतो आणि आपण आजारी पडू शकतो. 

हिवाळा
हिवाळ्यात वेगवेगळ्या फॅशनचे गरम लोकरीचे कपडे घालावेत. जसे पोलोनेकचे टी-शर्ट, स्वेटर्स, कोट. वेगवेगळ्या रंगांच्या लोकरीच्या डिझाइनचे फॅशनेबल जिन्सवर टॉप घाला. 

स्कार्फ, मफलरचा गळ्यात वेगवेगळ्या स्टाइलने वापर करावा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. लेदरचे कोटही थंडीत घालता येतात. ज्यात फॅशनही होते आणि थंडीपासून संरक्षणही मिळते. 

साडी नेसणार असाल, तर पूर्ण बाह्यांचा ब्लाउज घाला आणि त्यावर लोकरीचा ब्लाउजही घालता येऊ शकेल. वेस्टर्न आउट फिटचा वापर केल्यास जिन्स घालता येते. ज्यामुळे थंडीपासून बचाव होतो आणि त्यावर वेगवेगळ्या फॅशनचे लोकरीचे किंवा जाड कापडाचे शर्ट, पूर्ण बाह्यांचे टी शर्ट, कोट, जॅकेट घालता येऊ शकतात. शूजचा वापर जास्त करावा, ज्यामुळे पायांना थंडी वाजणार नाही आणि वेस्टर्न आउट फिटवर ते चांगलेही दिसतील. 

उन्हाळा
उन्हाळा म्हणजे सगळ्यांसाठी न आवडणारा ऋतू. ज्यात उकडते जास्त. त्यामुळे या ऋतूत कमीत कमी कपड्यांचा वापर केला जातो. ज्यात समोरून बघणाऱ्याला ही एक प्रकारची फॅशन आहे, असेच वाटते. कॉटनचे आणि तेही पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. कारण, घाम आल्यावर या कपड्यांत घाम शोषला जातो. डिव्हायडेड स्कर्ट, थ्री-फोर्थ पॅंट, डुंगारीचा वापर करावा. कॉटनचे सलवार-कमीज, कुर्ते घालावेत. उन्हाळ्यात घाम खूप येतो, म्हणून बगलेमध्ये स्वेट आर्म पॅडचा वापर करावा, जेणेकरून घाम त्यात शोषला जाईल. शिवाय, बगलेत घामाचे डागही पडणार नाहीत. वेगवेगळ्या स्टाइलच्या उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याबरोबर एक फॅशन म्हणून सन-ग्लासेसचा वापर करता येतो.

हे सगळे तर झालेच; पण याच बरोबर पारंपरिक पोषाखांच्या फ्यूजनचा वापर करावा, जी एक सर्वांत उत्तम फॅशन होऊ शकते.

संबंधित बातम्या