तनिष्का सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

सप्टेंबर महिना तसा खूप आनंदाचा असतो. पावसाच्या हलक्‍या सरी असतात. मधूनच मोठा पाऊसही येतो आणि वातावरणात गारवा पसरतो. वाऱ्याच्या साथीनं सूर्याची किरण मधूनच पसरू लागतात. उन्हाचा कवडसा येतो आणि गारठलेल्या हवेला ऊब देतो. सुखद हवेचा तसा सणांच्या उत्साहाचा हा महिना. गणपतीचा उत्साह गावागावात संचारलेला असतो.

सप्टेंबर महिना तसा खूप आनंदाचा असतो. पावसाच्या हलक्‍या सरी असतात. मधूनच मोठा पाऊसही येतो आणि वातावरणात गारवा पसरतो. वाऱ्याच्या साथीनं सूर्याची किरण मधूनच पसरू लागतात. उन्हाचा कवडसा येतो आणि गारठलेल्या हवेला ऊब देतो. सुखद हवेचा तसा सणांच्या उत्साहाचा हा महिना. गणपतीचा उत्साह गावागावात संचारलेला असतो.

गौराईची वेगवेगळी रुप दाखवण्याची जणू चढाओढ लागते. सध्या तर सोशल मिडियामुळं ही सजावट, त्यातली विविधता क्षणात सगळीकडे पोहोचते आहे. ‘लाइक’नी त्याचं कौतुक होतंय. त्यामुळं सजावटीचा उत्साह वाढतोच आहे. ‘गौरी वुइथ सेल्फी’ आणि ‘गणपती वुइथ सेल्फी’ही जोरात पार पडले आहेत.
आता असेल ती नवरात्रोत्सवाची धामधूम. दुर्गापूजा आणि रासदांडिया हे महाराष्ट्रात इतकं मिसळून गेलं आहे, की जणू ते नवरात्रोत्सवाचाच भाग वाटावा. दुर्गेची रुपं अनेक...मोहक, दुष्टांचा नाश करणारी, प्रसंगी कठोर बनणारी. ‘तनिष्का’ही स्त्रीच्या दुर्गेसारख्या विविध रुपांना, तिच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देत आले आहे. तनिष्काला सप्टेंबर महिन्यात अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांचं कर्तृत्व दाखविणारा हा अंक आहे, ‘यंग अचिव्हर्स’.

औरंगाबादजवळ ग्रामीण भागात राहणारी अमरिन मनानं प्रेमळ आणि कुस्ती खेळताना ताकद दाखवणारी. पुण्यात राहणारी दीक्षा स्वतः अपंग असताना इतरांना आनंदानं जगण्याची प्रेरणा देणारी. रचना बगाडे लहान वयात कॉलेजमधील प्रोजेक्‍टचा खर्च स्वतःच उचलावा या उद्देशाने नवीन कल्पना लढवून त्याचे व्यवसायात रुपांतर करणारी. सिनेक्षेत्रासारख्या ग्लॅमरस क्षेत्रात असूनही सामाजिक भान ठेवत समाजासाठी काम करणारी राजश्री. अंतराळाच्या वेडानं झपाटून अंतराळवीर झालेली स्वीटी. ग्रामीण भागातील मुलांसाठी शाळा काढून स्वतः तिथे जाऊन शिकवणारी सानिया. अशी कितीतरी रुप, त्यांच्या प्रेरक कथा, स्त्रीनं मिळवलेलं यश या अंकातून वाचणार आहोत. या प्रत्येकीत अर्थातच जिद्द आहे. अंकातील प्रत्येक कथा, प्रत्येक अनुभव जगण्याचं बळ देणारं आहे. स्वावलंबनानं उभा करणारा आहे. गाव असो किंवा शहर, आपल्या आवडीच्या कामानुसार सतत नवीन काही शोधत राहिलं तर कामातला आनंद घेतो येतो. समाजासाठी चांगलं काम करतं, हे यातल्या काहीजणींच्या अनुभवातून समजतं. अशा सगळ्याजणींचा वर्धापनदिनाच्या या अंकातून आम्ही सन्मान करत आहोत.

तनिष्काच्या पहिल्या वर्षापासूनच अनेक मैत्रिणी तनिष्काशी जोडल्या गेल्या. स्वतःची स्पेस मिळवण्यासाठी तनिष्काचा फायदा झाल्याचे अनुभव अनेकींनी ‘शेअर’ केले. कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कोणी बुटिक सुरू केलं. अकरा वर्षांत ज्या स्वावलंबी झाल्या त्यांचा तनिष्काला नक्कीच अभिमान आहे. कुटुंब सांभाळतानाच प्रत्येक स्त्रीने स्वतःची स्पेस तयार करावी असाच उद्देश तनिष्काचा पहिल्या वर्षी होता. गेल्या अकरा वर्षात अनेकजणी स्वावलंबी झाल्या. आता त्यांच्या कामात नाविन्य आणणं किंवा बदलत्या जगाबरोबर त्यांचा व्यवसाय किंवा सामाजिक काम नेणं असा उद्देश आपण ठेवू. असा प्रयत्न करत असलेल्या सर्व ‘तनिष्का’ना वर्धापन दिनानिमित्त सलाम!    

वर्धापनदिनाच्या निमित्तानं स्त्रीचं यश मांडलं आहे. तिच्यातली जिद्द दाखवली आहे. प्रत्येकीला स्वतःचं एक अवकाश असावं असं दहा वर्षांपूर्वीचं म्हणणं आता बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरत आहे. तुमचं अवकाश अर्थात तुमची स्पेस आहे का? हे प्रत्येकीनंच यानिमित्तानं आजमावून पाहु या! २०१७ मधला जवळजवळ पाऊण भाग संपलाय. आपल्या हाती आहेत तीन महिने. स्वतःच्या आयुष्याच्या सन्मानार्थी होण्यासाठी, स्वतःचं आयुष्य सुरू करण्यासाठी याहून योग्य वेळ कोणती?...

संबंधित बातम्या