फॅशन पॅशन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

’मेरा जुता है जापानी...ये पतलून इंग्लिस्तानी...सर पें लाल टोपीं रुसी...फिर भी दिल है हिंदुस्थानी...’ असं राज कपूर ’श्री ४२०’मध्ये गायला, त्याला आता थोडीथोडकी नव्हेत, तब्बल ६२ वर्षे झालीत. ’आउटफिट’, ’अॅक्‍सेसरिज’, ’फिट’ वगैरे शब्द या गाण्यात नाहीत; पण मुखड्यातल्या प्रत्येक शब्दात भविष्यातलं ’फॅशन स्टेटमेंट’ होतं. तेव्हा ’ॲमेझॉन’, ’फ्लिपकार्ट’, ’एजिओ’, ’मिंत्रा’ वगैरे वगैरे स्वप्नातही नव्हते. तरीही राज कपूर कदाचित ’फॅशन स्टेटमेंट’ सांगत होता. ’जे काही परिधान कराल, ते मनापासून करा...स्वतःविषयी कमालीचं प्रेम त्यातून दिसू द्या...’ असं हे ’फॅशन स्टेटमेंट’. आजच्या काळाला एकदम ’बॉडी फिट’.

अंग झाकण्यासाठी वस्त्र परिधान करणं ही मूलभूत मानवी गरज आहे, तर ’फॅशन’ मूलभूत मानवी गरजेला आनंददायी, सुखकारक, रुबाबदार बनविणारी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जागतिक आहे आणि प्राचीनही. इजिप्त ते हडप्पा या उत्खननाच्या प्रवासात स्त्रियांनी आणि पुरुषांनीही ’फॅशन’ केल्याचे पुरावे आहेत. ’फॅशन’ ही उत्क्रांत होत जाणारी प्रक्रिया आहे. मानवी विकास, जगण्यातले चढ-उतार, आयुष्याचा वेग आदी गोष्टींचा संदर्भ ’फॅशन’मागे आहे. मानवी उत्क्रांतीचे अभ्यासक तत्कालीन ’फॅशन’चा आवर्जून अभ्यास करतात. ’फॅशन’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्मिती कुठल्या प्रदेशात होते, तिचा दर्जा काय, यावरून त्या काळातील अनेक गोष्टी उमजतात.

आजच्या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वाधिक महत्त्व आहे आणि व्यक्तिमत्त्व रुबाबदार, आकर्षक आणि कालसुसंगत राहण्यासाठी तुम्ही जे परिधान करता, ज्या अॅक्‍सेसरिज्‌ वापरता, जे फॅब्रिक निवडता त्याचा वाटा मोठा आहे, असं तज्ज्ञांचं सांगणं आहे. ’फॅशन’ म्हणजे अंगभर सोन्याचे दागिने परिधान करणे नव्हे आणि फॅशन म्हणजे महागडे कपडे खरेदी करणेही नव्हे, तर ’फॅशन’ म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवणं, अशी मांडणी या तज्ज्ञांनी केली आहे.

रॅम्पवर दिसते, सेलिब्रेटिज वापरतात ते कपडे, अॅक्‍सेसरिज म्हणजे फॅशन असं समजण्याचा काळ आता मागे पडला आहे. जगभरात जे ट्रेंडमध्ये आहे आणि स्वतःला ज्या कपड्यांतून, अॅक्‍सेसरिजमधून आनंद वाटतो आहे, ते म्हणजे फॅशन. प्रत्येकीच्या शरीराचा आकार वेगळा आणि खरंतर त्यानुसार ’फॅशन’ही वेगळी, त्या आकाराला सूट होणारीच हवी, असं तज्ज्ञ सांगत आहेत. तुमच्या शरीराचा आकार नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाचा उठावदारपणा तुमच्या ’फॅशन’मधून प्रदर्शित व्हायला हवा, अशी वेगळी वाट तज्ज्ञ सूचवतात. ती लक्षात घ्यायला हवी. लाखो स्त्रियांना रोजच्या धबडग्यातून स्वतःसाठी तासभर काढता येत नाही. अशा परिस्थितीत फॅशन वगैरे दूरची बाब, म्हणून दुर्लक्ष होतं. ते करू नका. आत्मविश्वास आणि स्वतःविषयीचं प्रेम व्यक्त करण्याची बाब म्हणून ’फॅशन’कडं पाहिलं पाहिजे. जे नवीन आहे, ते किमान हाताळलं पाहिजे, शक्‍य तो वापरलं पाहिजे आणि आपल्याला नव्या जगासोबत ताज्या दमानं जोडत राहिलं पाहिजे. मार्केटमध्ये नवीन काय, हे पाहायला वेळ नाही, ही अडचण ऑनलाइन शॉपिंगच्या सुविधेमुळं दूर झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग कसं करावं, हे माहिती व्हावं. त्याचवेळी ऑनलाइन शॉपिंगमधले धोकेही समजावून घ्यायला हवेत.

संबंधित बातम्या