दिवाळीची नवी क्षितीजं 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

जेव्हा स्त्री स्वतःच्या कमकुवतपणावर नव्हे; तर ताकदीवर प्रेम करू लागेल...

जेव्हा स्त्री स्वतःला शोधण्यासाठी स्वतःपासून पलायन करणं थांबवेल...
जेव्हा स्त्री स्वतःला स्वतःपासून तोडायला नव्हे; तर ठामपणानं उभं राहायला शिकेल...

तेव्हा प्रेम हे तिच्या जीवनाचा स्त्रोत बनेल; जसं पुरूषाचं आहे...ते केवळ मर्त्यपणाचा धोका राहणार नाही...

जेव्हा स्त्री स्वतःच्या कमकुवतपणावर नव्हे; तर ताकदीवर प्रेम करू लागेल...

जेव्हा स्त्री स्वतःला शोधण्यासाठी स्वतःपासून पलायन करणं थांबवेल...
जेव्हा स्त्री स्वतःला स्वतःपासून तोडायला नव्हे; तर ठामपणानं उभं राहायला शिकेल...

तेव्हा प्रेम हे तिच्या जीवनाचा स्त्रोत बनेल; जसं पुरूषाचं आहे...ते केवळ मर्त्यपणाचा धोका राहणार नाही...

विसाव्या शतकाचा परीघ व्यापणाऱ्या प्रख्यात स्त्रीवादी फ्रेंच लेखिका, तत्वचिंतक सीमॉन द बुवआर (१९०८-१९८६) यांनी स्त्रीकडून व्यक्त केलेली ही अपेक्षा. या लेखिकेच्या विचारांना आता सहा-सात दशकं उलटली आहेत आणि केवळ फ्रान्समधीलच नव्हे; तर जगभरातील स्त्रियांनी सीमॉन यांनी मांडलेल्या अपेक्षांच्या दिशेने कळत न कळत; परंतू जोमानं पावलं टाकलेली आहेत. आजची स्त्री स्वतःच्या ताकदीवर प्रेम करते आहे. स्वतःपासून पळून जाणं ती टाळते आहे आणि ठामपणानं उभीही राहते आहे. कर्तृत्व दाखवून कमावलेल्या आत्मविश्वासानं स्त्रीनं एकविसाव्या शतकात प्रवेश केला आणि पाहता पाहता गेल्या दीड दशकांमध्ये आव्हानांची नवी क्षितीजं तिनं पार केली. आव्हानांची नवी क्षितिजं ओलांडणाऱ्या स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा सोहळा ‘तनिष्का’च्या यंदाच्या दिवाळी अंकात आम्ही साजरा करत आहोत. 

परिघाबाहेर जाऊन एका वेगळ्या विषयाची मांडणीही यंदाच्या दिवाळी अंकात आहे. शहरांमध्ये राहून गावाची ओढ मनात कुठल्या तरी कोपऱ्यात दडून राहते. या ओढीतून पावलं गावाकडं वळतात. त्यातून काही नव्या वाटा निर्माण होतात. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ‘तनिष्का’नं केला आहे.

गावातलं गावपण, गावातली दिवाळी, गाव जपणं, शहरात न जाण्यानं आणि शहरात जाण्यानंही आयुष्यात काही हरवणं...हे सगळं या दिवाळी अंकाच्या निमित्तानं मांडलं आहे. जगण्यातलं सौंदर्य शोधलं आहे तसं बाईच्या सौंदर्यावरही या अंकातून चर्चा केली आहे.

सौंदर्य या शब्दाचा जन्मच जणू स्त्रीनं दिला आहे, इतकं या शब्दाचं आणि तिचं नातं आहे. सौंदर्याची परिभाषा स्त्रीपाशी सुरू होते आणि स्त्रीपाशीच संपते. सौंदर्य नेमकं कशाचं पहायचं? शारीरिक की मानसिक? ‘तनिष्का’नं या विषयावर बोलायला, विचार करायला भाग पाडलं आहे. आजची स्त्री स्ट्राँग अर्थात सक्षम बनते आहे. ‘स्ट्राँग वुमन’ म्हणजे नेमकं काय, या सहसा न चर्चेला आलेल्या विषयावर मान्यवरांचे ‘तनिष्का’मध्ये काही प्रेरक अनुभव आहेत. सौंदर्य, बोल्डनेस, स्ट्राँगनेस या स्त्रीने स्वतःवर प्रेम करण्याच्या आणि आत्मभानातून आलेल्या नव्या जाणिवा आहेत. दिवाळीच्या निमित्तानं हा सौंदर्याचा विषय घेतला कारण दिवाळी हा सौंदर्य आणि आनंद याची उधळण आपल्या आयुष्यात करणारा सण...

साहित्याची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे दर्जेदार दिवाळी अंक! हे दिवाळी अंक तुम्हा-आम्हाला किती काही देत असतात...‘तनिष्का’ची ही दिवाळी भेट तुमच्या आयुष्याला नवा अर्थ मिळवून देऊ दे..

संबंधित बातम्या