बदलाची प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

आठ-दहा वर्षांचा मुलगा मोबाईल सहज हाताळतो. घरातली आजी त्याला मोबाईल कसा वापरायचा याबद्दल विचारते. तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तिला परत-परत समजावतो. आजी म्हटलं तर अनुभवी, पण तिला काही मोबाईलमधले बदल लवकर लक्षात येत नाहीत. आजी ज्या कोऱ्या चेहऱ्यानं बघते, त्यानं क्षणभर तो मुलगा वैतागतो. दोघांच्या मधल्या पिढीतल्या आई किंवा बाबालाही ही परिस्थिती हाताळता येत नाही. क्षणाक्षणाला मोबाईलचं जग म्हणजेच हे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचं जगं बदलत आहे. बदलणारं हे जगं माणसाच्या आयुष्यातही झपाट्यानं बदल घडवतं आहे.

आठ-दहा वर्षांचा मुलगा मोबाईल सहज हाताळतो. घरातली आजी त्याला मोबाईल कसा वापरायचा याबद्दल विचारते. तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तिला परत-परत समजावतो. आजी म्हटलं तर अनुभवी, पण तिला काही मोबाईलमधले बदल लवकर लक्षात येत नाहीत. आजी ज्या कोऱ्या चेहऱ्यानं बघते, त्यानं क्षणभर तो मुलगा वैतागतो. दोघांच्या मधल्या पिढीतल्या आई किंवा बाबालाही ही परिस्थिती हाताळता येत नाही. क्षणाक्षणाला मोबाईलचं जग म्हणजेच हे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचं जगं बदलत आहे. बदलणारं हे जगं माणसाच्या आयुष्यातही झपाट्यानं बदल घडवतं आहे.

जगणंच बदलत चाललंय. आत्ताची पिढी वाढताना वेगानं वाढते आहे. जिथं आधीची पिढी जुन्या पुस्तकांच्या पानांमधल्या गंधात समाधान शोधत राहते तिथं नव्या पिढीला किंडलवर नवी दिशा दिसते आहे. जिथं आधीची पिढी अख्ख्या समाजाचा विचार करते आहे तिथं नवी पिढी आपल्याला हव्या त्या ग्रुपचा मर्यादित समाज पाहून बदलांना सामोरी जाते आहे, याला आपण ‘क्रांती’ म्हणतो. बदल हा नेहमीच नवी गोष्ट घडवत असतो. इतिहासात जाऊन आपण जेव्हा माणसाची उत्क्रांती बघतो, तेव्हा माणूस बदल घडवत गेला, म्हणून विकास घडत गेला हे अगदी सहजतेनं जाणवतं, म्हणूनच बदल घडायलाच हवेत.

एकीकडं मुलांना हव्या त्या सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्याच वेळी बदलत्या जगाला किंवा बदलत्या सामाजिक परिस्थितीला नावं ठेवली जातात. नवी पिढी चांगली घडावी, हे सांगताना आपल्याच मुलांसाठी चांगले पर्याय समोर ठेवणं, ही प्रत्येकाची जबाबदारी नाही का? इथं नवी पिढी घडवणं हा मुद्दा नाही. मुद्दा आहे बदल स्वीकारण्याचा. चांगला बदल करण्यास प्रत्येकानं आपल्या घरापासूनच सुरुवात केली तर नवी पिढी चांगली घडेलच. खरं तर हे चांगले पर्याय मुलांसाठी मर्यादित तरी का? स्वतःसाठी का नाही असाही विचार करून बघा. नवे चांगले बदल या पिढीनंही स्वीकारायला हवेतच. 

मार्च महिन्यातल्या महिला दिनाच्या निमित्तानं जेव्हा महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि प्रगतीचा विषय समोर आला तेव्हा या बदलाची प्रकर्षानं जाणीव झाली. अमिताभ बच्चन यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ट्विटरवर पोस्ट टाकली, ‘माझ्यानंतर माझ्या संपत्तीचा समान वाटा माझ्या मुलग्याला आणि मुलीला मिळेल.’ त्यातून बोध घेऊन सगळ्यांनीच अशी समानता आचरणात आणावी, हाच त्यांचा उद्देश. संपत्तीच नव्हे तर खाण्यापिण्यातली समानताही मुलांमुलींमध्ये दिसणं, हे दुर्दैव म्हणावं लागेल.

याच अंकात निशा पाटीलनं काही अनुभव लिहिले आहेत. छोट्या गावात मुलींना किती बंधनं आहेत, हे ती आसपास बघते. मोठ्या शहरात जाते तेव्हा ही बंधनं कमी व्हायला हवीत ही जाणीव तिला होऊ लागते. अशी जाणीव प्रत्येक घरात व्हायला हवी. मुलींना चौकस आहार मिळायला हवा, हे अजूनही सांगांव लागणं हे बदलाचं किंवा पर्यायानं ‘क्रांती’चं लक्षण नाहीच. असा बदल घडेपर्यंत ‘ति’च्या विकासाला मर्यादा या राहणारच.

या अंकात...
स्त्री-पुरुष समानतेचं वारं मार्च महिन्यात जोरातच वाहू लागतं. स्त्रिया नवनवीन क्षेत्रात प्रवेश करत आहोत हे आपण पाहतो. या स्त्रीला पुरुष कसा समजावून घेतो याचा विचार या अंकात केला आहे. ‘टिपीकल’ विचार केला तर, बाईच्या हाताला चव असते, मग पुरुष शेफ ही चव कशी आणतात? अशीच बायकांची म्हणून काही क्षेत्रं आहेत, जिथं पुरुष काम करतात. अशा पुरुषांचा स्त्री समजून घेतानाचा अनुभव दिला आहे खास मार्च महिन्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने.

संबंधित बातम्या