घराच्या गुलाबी छटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

घरासाठी इंटिरिअर करताना अनेकदा मुलींच्या रूमसाठी गुलाबी रंगाचा वापर केला जातो. गुलाबी रंग हा केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर तो आपल्या आशा पल्लवित करतो आणि आपला भावनिक उत्साहही वाढवतो. आपला राग आणि आक्रमक वृत्तीही त्यामुळे शांत होते. 

घरासाठी इंटिरिअर करताना अनेकदा मुलींच्या रूमसाठी गुलाबी रंगाचा वापर केला जातो. गुलाबी रंग हा केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर तो आपल्या आशा पल्लवित करतो आणि आपला भावनिक उत्साहही वाढवतो. आपला राग आणि आक्रमक वृत्तीही त्यामुळे शांत होते. 

गुलाबी रंग कधी प्रेमाचा म्हणून जोडला
जातो तर कधी तो रंग स्त्रियांसाठी आहे, असं म्हटलं जातं. गुलाबी मोहक छटा आवडतात म्हणून घर सजवतानाही गुलाबी रंगाचा विचार केला जातो.
घराच्या रंगसंगतीत गुलाबी रंगाचा वापर साधारणपणे मुलींच्या रूमसाठी केला जातो कारण बहुसंख्य मुलींचा तो आवडीचा रंग असतो. मुलाच्या रूमला निळा आणि मुलीच्या रूमला गुलाबी रंग देण्याची पद्धत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली आहे; पण घरातील इतर इंटिरियरमध्येही गुलाबी छटांचा उपयोग करता येतो आणि तो डोळ्यांना सुखावणारा असतो.

लिव्हिंग रूम
इंटिरियरमध्ये लिव्हिंग रूमच्या सजावटीला फार महत्त्व असते, कारण पहिले इंप्रेशन तिथेच पडते आणि त्यावरून एकंदरीत घराची अंतर्गत सजावट कशी असेल, याची कल्पना येते. गुलाबी रंगाच्या छटेची जादू केली तर रूमचा सारा नूरच पालटून जातो, कारण हा रंग विनयशीलतेचे प्रतीक मानला जातो.
लिव्हिंग रूममधील एका भिंतीला गडद गुलाबी रंग किंवा त्या छटेचा टेक्‍स्चर पेंट आणि इतर भिंतींना क्रीम कलर दिला तर सौंदर्यात भर पडते. सोफ्याच्या कुशन्ससाठी फिकट गुलाबी रंग वापरला आणि कॉफीटेबलला हलक्‍या गुलाबी छटेचे लॅमिनेशन वापरले तर ते अतिशय आकर्षक दिसते. गुलाबी रंग शोभून दिसण्यासाठी रंगसंगतीला फार महत्त्व असते. काळ्या आणि राखाडी रंगाबरोबर गुलाबी छटा मोहक दिसते.

किचन
किचनमध्येही गुलाबी रंगाचा वापर करता येतो, कारण तेथे गृहलक्ष्मीचेच राज्य असते. या रंगामुळे स्त्रीचा कामाचा उत्साह अधिकच वाढतो. तसेच हा रंग फिकट असल्यामुळे स्वच्छताही ठेवता येते. बरीचशी अप्लायन्स सध्या गुलाबी रंगात उपलब्ध असल्याने रंगसंगतीही साधता येते. मिक्‍सर, मायक्रोओव्हन, फ्रीज वगैरे वस्तू गुलाबी छटेत मिळतात. डायनिंग टेबलचा वरचा भाग हलक्‍या गुलाबी छटेतील असेल तर तो छान दिसतो.

बेडरूम 
मास्टर बेडरूममध्ये गुलाबी रंगाचा उपयोग केला तर अतिशय शोभिवंत दिसते. मात्र, त्यासाठी योग्य रंगसंगती आवश्‍यक असते. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन बहारदार दिसते. भिंतींना हलका गुलाबी रंग आणि फर्निचर सफेद रंगाचे असेल तर ते पाहताना मन हरखून जाते. गुलाबी रंगाची प्रकाशयोजना केली तर सौंदर्यात आणखीनच भर पडते.
 तसं पाहिलं तर सर्वच रंग मनाला भुरळ पाडणारे असतात; पण गुलाबी रंगाच्या प्रेमात अनेक जण पडतात म्हणूनच गुलाबी रंगाच्या छटांना अनेक नावे देण्यात आली आहेत. शोकिंग पिंक, हॉट पिंक, व्हिंटेज पिंक अशा कितीतरी नावांनी गुलाबी रंग लोकप्रिय आहे.

ताळमेळ, आपसांतील समन्वयाला जीवनात फार महत्त्व असते. तसेच रंगाचेही आहे. एकमेकांच्या मिलाफाने हे रंग अधिकच वेधक ठरतात. लाल आणि गुलाबी रंगांचे कॉम्बिनेशन आपल्या मनात कंपने निर्माण करतात आणि आपले मन हेलावून टाकतात. मेटालिक्‍स रंगामुळे गुलाबी जास्त उठावदार दिसतो. गुलाबी आणि नारिंगी यांची रंगसंगती तर अनोखी किमया करते. हिरवा आणि गुलाबी या रंगाचे कॉम्बिनेशनही खूपच आकर्षक भासते. मानसशास्त्रानुसार विविध रंगांचा आपल्या मनावर परिणाम होतो. गुलाबी रंग हा केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर तो आपल्या आशा पल्लवित करतो आणि आपला भावनिक उत्साहही वाढवतो. आपला राग आणि आक्रमक वृत्तीही त्यामुळे शांत होते. बायबलमध्येही निरनिराळ्या रंगांचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, गुलाबी रंग म्हणजे तुमचं देवाबरोबरचं घट्ट नातं..! 

मात्र, हे सगळं करतानाही त्यांनी त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष केलेलं नाही. सध्या त्या ‘माझी आई तिचा बाप’ या नाटकाच्या तालमीत गर्क आहेत. ‘लाइफ बिर्याणी’ व ‘कानू’ अशा दोन आगामी चित्रपटात त्यांच्या भूमिका आहेत.

संबंधित बातम्या