हम्पी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हम्पीची ओळख होती. इथे प्रामुख्याने पाहण्याच्या गोष्टी म्हणजे, हम्पीचे विठ्ठल मंदिर, कोदंड राम मंदिर, लोटस महाल, हत्ती खाना, विरुपाक्ष मंदिर, विजयविठ्ठल मंदिर. या मंदिरांत असे दगडात कोरीव काम केलेलं असे खांब आहेत, ज्यातून खांब वाजवल्यावर तबल्याचे स्वर निघतात, तिथेच पुढे पुष्करणी आणि हजार शिवलिंग मंदिर आहे. 

हम्पीवरून आपण बदामीच्या कोरीव काम केलेल्या गुहा आणि बदामी बनशंकरी देवीच्या दर्शनालाही जाऊ शकतो. पावसाळ्यात या ठिकाणी जाऊन यावं. इथे सर्वसाधारणपणे पावसाचे प्रमाण कमी असले तरी पावसाळ्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. एरवी इथे उन्हामुळे सर्व ठिकाणांना पाई फिरणं अवघड होतं. ही कर्नाटकची टूर आपण आपल्या कारने करू शकतो किंवा बसनेदेखील करू शकतो. आजकालच्या ट्रेंडप्रमाणे बाइक टूर करणंदेखील शक्‍य आहे. 

बाइक किंवा कारने प्रवास करायचा असेल, तर विविध ठिकाणे अगदी कमी वेळेत आपण फिरून येऊ शकतो. अकलूजच्या जवळ वाइन टुरिझम केले जाते किंवा अकलूजला सयाजीराजे वॉटर पार्क आहे. तसेच आकालाई देवीचे मंदिर, आनंदी गणेश मंदिर, आणि एक भुईकोट किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.  पुण्यानजीक वेल्ह्याजवळ निसर्गासह राहण्याचा आनंद घेण्याची अनेक ठिकाणं आहेत. ॲग्री टुरिझमच्या धर्तीवरही नवीन रिसॉर्ट आहे. पूर्वांपार चालत आलेली ट्रेक संस्कृती थोडी लांब ठेवून दऱ्याखोऱ्यांत सुटी घालविण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

महाराष्ट्राला खूप मोठी आणि खूप सुंदर किनारपट्टी आहे. सागरी किल्ले आहेत. वीकेंडला या किल्ल्यांना भेट देता येईल. या वेळी मात्र थोडासा पाऊस बघूनच जावं. जर खूपच पावसाचा जोर असेल, तर आपण समुद्रकिनारा टाळावा. 

नांदेड
नांदेड हे एक पर्यटनासाठी चांगले ठिकाण आहे. जगप्रसिद्ध गुरु हुजूरसाहेब गुरुद्वारा इथे आहे. नांदेडपासून ५५ कि.मी. दूर प्रसिद्ध कंधार किल्ला आहे. उन्हाकेश्वरला गरम पाण्याचे झरे आणि सहस्रकुंड धबधब्यालादेखील पावसाळ्यात आपण भेट देऊ शकतो. 

पुण्याहून ४५९ कि.मी. अंतर आहे. माहूरगडलाही जाता येईल. नांदेड हे अंतर अंदाजे तीन तासांचे आहे.

संबंधित बातम्या