भित्तिचित्रांची  भेट..!

डॉ. भारती माटे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

व्हॅलेंटाइनसाठी भेट म्हणून देता येतील अशा नवनवीन गोष्टी शोधल्या जातात. वॉल म्युरल गॅलरीला भेट दिली तर एक अनोख्या भेटीचा पर्याय नक्कीच मिळेल...

सतराव्या शतकाच्या शेवटी-शेवटी गुलाबी रंगाचा उल्लेख प्रामुख्याने युरोपमध्ये सर्वप्रथम आढळतो. नंतर अमेरिकेतही त्याची ओळख किंवा रंगसंकेत सौंदर्य, नम्रता, संवेदनक्षमता, नाजूकता, गोडवा, बालपण/निरागसता, स्त्री आणि प्रणय याच्याशी निगडित असलेला आढळतो. 
भारतीय चित्रशैलीत हा राणी कलर (मॅजेंटा) स्वरूपात आढळतो.

राजस्थानातील लघुचित्रांमध्ये हा काहीसा मातकट गुलाबी असा दिसतो. भारतात ही गुलाबी रंगाची लहर ब्रिटिश राजवटीपासून आलेली दिसते. राणी रंगामध्ये पांढरा रंग कमी-जास्त मिसळला की, गुलाबी रंगाच्या नानाविध छटा अगदी फिक्‍यापासून गडद रंगांपर्यंत तयार होतात. त्यातच काकणभर फिका निळा घातला तर लव्हेंडर (निळसर झाक असलेला गुलाबी) छटा तयार होते. गुलाबी रंगाची ही हवीहवीशी हवा..!

जपानमधील चेरी ब्लॉसमचे बहर, युरोपातील संत व्हॅलेंटाइनची स्मृती, अशा अनेक गोष्टी गुलाबी रंगाशी निगडित आहेत. आता एकविसाव्या शतकात तर रोज नवीन कल्पना भेट देण्यासाठी खुणावत आहेत. प्रत्येकाला आवडणारं त्याचं घर या व्हॅलेंटाइन गुलाबी रंगाने सजवण्याची, नित्य हा प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक अनोखी भेट आपली वाट पाहत आहे.

चित्रकार सुनील बलकवडे यांच्यासह वॉल म्युरल गॅलरीची निर्मिती मी केली. ही अनोखी भित्तिचित्रे (थ्रीडी, रंगावली, मार्बलमध्ये आहेत.) अतिशय आकर्षक व संवादी निसर्गापासून तुटत चाललेल्या जनमानसाला तोच निसर्गाचा सुसंवादी अनुभव ही भित्तिचित्रे देतात. घराची एक वेगळी ओळख किंवा स्वतंत्र अभिव्यक्‍ती देण्याची क्षमता या भित्तिचित्रात आहे. 

गुलाबी रंगाच्या, गुलाबी गुलाबांच्या आणि गुलाबी गाण्यांच्या आठवणी ही वॉल म्युरल्स नक्कीच जागवतील. या शेजारच्या भित्तिचित्रामध्ये खूप सारी गाणी शोधा, तुम्हाला हवे ते गाणे आणि हवी ती भित्तिचित्रे इथे तुम्हाला नक्कीच सापडतील. 

काट्याविनाच केव्हा हाती गुलाब यावा किंवा चंद्रावरती दोन गुलाब, अशी अनेक भित्तीचित्रे पाहता येतील.

संबंधित बातम्या