केक अँड स्वीट : स्ट्रॉबेरी केक जार 

रावी कुलकर्णी
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

स्ट्रॉबेरी केक जार
साहित्य :
दीड कप मैदा, दीड टी स्पून बेकिंग पावडर, पाव कप बटर, 1 कप पिठी साखर, 3 अंडी, 1 टी स्पून व्हॅनिला इन्सेस / 1 कप फेटलेले क्रिम, 4 ते 5 स्ट्रॉबेरी, एक काचेचा जार 

कृती : मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून ठेवा. बटर व साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये अंडी घालून वरील सर्व मिश्रण एकत्र करा. त्यात मैदा, व्हॅनिला इन्सेस, दूध घाला. हे मिश्रण केकच्या भांड्यात घालून 180 डिग्रीवर 20 ते 30 मिनिटे बेक करा. केक गार झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करून जारमध्ये घाला. त्यावर स्ट्रॉबेरीचे कप घाला. त्यावर फेटलेले क्रिम घाला. 

व्हाईट चॉकलेट ऍण्ड स्ट्रॉबेरी मुस 
साहित्य :
अर्धा कप व्हाईट चॉकलेट, अर्धा स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट बार, प्रत्येकी अर्धा कप फ्रेश क्रिम, व्हीप क्रिम, 10 ते 12 स्ट्रॉबेरी सजावटीसाठी 
 
कृती : सर्वप्रथम एक भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये छोटे भांडे ठेवून त्यात व्हाईट चॉकलेट घाला. ते विरघळल्यावर भांडे गॅसवरून खाली उतरवा. आता त्यात अर्धा कप क्रिम घाला. गार करण्यासाठी ते फिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर दोन चमचे व्हीप क्रिम घाला. मिश्रण फिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. 
हीच प्रक्रिया स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट बारबरोबर करा. सजावट करताना ग्लासमध्ये प्रथम स्ट्रॉबेरी घाला. त्यावर व्हाईट चॉकलेट मूस घाला. एक तास फिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. 

चॉकलेट केक बॉल 
साहित्य :
एक छोटा स्पॉंज केक 100 ग्रॅम, तीन चमचे चॉकलेट सॉस, 50 ग्रॅम डार्क चॉकलेट, चार टे. स्पून दूध 
 
कृती : स्पॉंज केक बारीक कुसकरून घ्या. त्यात चॉकलेट सॉस घालून एकत्र मळून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. त्या भांड्यात एक छोटे भांडे ठेवा. त्यात डार्क चॉकलेट घाला. विरघळलेल्या चॉकलेटमध्ये 4 टे. स्पून दूध घाला. आता स्पॉंज केकच्या मळलेल्या मिश्रणाचे छोटे बॉल करून घ्या. त्यावर हा बनवलेला चॉकलेट सॉस वरून घाला किंवा बॉल त्यामध्ये डिप करा. 

चॉको-चिप्स केक 
साहित्य :
100 ग्रॅम मैदा, 1 टी. स्पून बेकिंग पावडर, प्रत्येकी 150 ग्रॅम बटर, पिठीसाखर, प्रत्येकी 4 टे. स्पून कोको पावडर, दूध, अर्धा टे. स्पून व्हॅनिला इसेन्स, 2 अंडी, 2 टे. स्पून चॉकलेट चिप्स 

कृती : केकच्या भांड्याला बटरने ग्रिस करा व मैदा भुरभुरून बाजूला ठेवा. मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या. अंड्यातील पांढरा व पिवळा भाग वेगवेगळा करून फेटा. अंड्यातील पिवळ्या भागात साखर व बटर एकत्र करून फेटा. नंतर अंड्यातील पांढरा भाग फेटून वरील मिश्रणात घाला. त्यामध्ये मैदा घालून पुन्हा फेटा. त्यात दूध, व्हॅनिला इसेन्स, कोको मिसळा. ग्रीस केलेल्या भांड्यात सर्व मिश्रण घालून 180 डिग्रीवर 30 मिनिटे बेक करा.

संबंधित बातम्या