मोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर

पीटीआय
बुधवार, 20 डिसेंबर 2017

5 नोव्हेंबरला वितरण ः जयंत सावरकरांच्या हस्ते वितरण होणार

5 नोव्हेंबरला वितरण ः जयंत सावरकरांच्या हस्ते वितरण होणार

सांगली : मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच याची माहीती माध्यमांना देण्यात आली.  रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल. संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
ते म्हणाले, ""अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समिती सांगली शाखेच्या वतीने रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौर पदक देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार रंगभूमीसह चित्रपट आणि मालिकांमध्ये चरित्र भूमिकांसह खलनायक म्हणून गाजलेले प्रसिध्द अभिनेते मोहन जोशी यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पंचवीस हजार रूपये असे आहे. सन 1959 मध्ये बालगंधर्वांना प्रथम पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावाळकर, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले. यंदाचे 51 वे वर्ष आहे.''

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह जनार्धन ताम्हणकर, कोषाध्यक्ष मेधाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, विलास गुप्ते, भास्कर ताम्हणकर, बीना साखरपे आदी उपस्थित होते.

यावेळी खास ई सकाळशी बोलताना मोहन जोशी म्हणाले, मला आजच दुपारी ही गोष्ट समजली आणि कमालीचा आनंद झाला. विष्णूदास भावे पुरस्कार हा अत्यंत मानाचा मानला जातो. अशा पुरस्कारासाठी निवड होण्याची आपली नक्की कुवत आहे की नाही असं मला वाटतं राहतं. पण हा पुरस्कार हा अल्टिमेट मानला जातो. या पुरस्कारासाठी माझी निवड होणं म्हणजे आजवरच्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. मी माझ्या सर्व प्रेक्षकांचा, भावे आयोजकांचा आणि हितचिंतकांचा आभारी आहे.

 

संबंधित बातम्या